बीड राजकारण

बीड जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत 25 टक्के मतदान

जिल्यातील 111 ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान सुरू

बीड – जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायत निवडणूकिच्या मतदानाला आज दि. 15 जानेवारीच्या सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरू झाले आहे. यात सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्ह्यात 25 टक्के मतदान झाल्याची माहिती विभागाने सांगितले आहे.
बीड जिल्ह्यामध्ये एकूण 129 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 18 बिनविरोध झाल्याने 111 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. 111 ग्रामपंचायतींमधील 842 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज सकाळपासून मतदानाला सुरवात झाली. सकाळपासून मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर मतदारांची रीघ लागलेली पाहायला मिळत आहे. त्यात सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्ह्यात 25 टक्के मतदान झाले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!