आष्टी दि 30 डिसेंबर/प्रतिनिधी
कोरोना संपला असे बहुतेकांना वाटत असेल पण अजून कोरोना संपला नाही.याच कोरोनाच्या संसर्गाने टाकळसिंग येथील माध्यमिक शिक्षक ला गाठले.अहमदनगर येथील एका रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
राज्य सरकारने 9 वी ते 12 वी पर्यत शाळा सुरू केल्यानंतर या शिक्षक ची कोरोना चाचणी केल्यानंतर ते पती पत्नी बाधित आढळून आले होते.पत्नी कोरोना मधून नीट झाली मात्र हे शिक्षक काही दिवस घरी राहिल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना आष्टी येथील खाजगी कोविड केंद्रात दाखल करण्यात आले होते.तिथेही त्यांची प्रकृती न सुधारल्याने त्यांना अहमदनगर येथील खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.त्यांची आज सायंकाळी प्राणज्योत मालवली.