देश विदेश

पंकजाताईंचा मध्यप्रदेशातही दिसला भूमिपुत्रांशी ऋणानुबंध !

भोपाळ (म.प्र.) २७ —– भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची लोकप्रियता आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांशी असलेली ऋणानुबंधाची नाळ किती घट्ट आहे, याचा प्रत्यय मध्यप्रदेशातही पहायला मिळाला.

झाले असे की, महाराष्ट्रातील साता-याचे रहिवासी असलेले भूमिपुत्र आएएस अधिकारी डाॅ. सुदाम खाडे (आयुक्त, जनसंपर्क) हे गेल्या पंधरा वर्षांपासून भोपाळ येथे कार्यरत आहेत. पंकजाताई मुंडे मध्यप्रदेशच्या सह प्रभारी झाल्यानंतर पहिल्यांदाच भोपाळ येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर डाॅ. सुदाम खाडे यांनी त्यांना आग्रहपूर्वक घरी येण्याचे निमंत्रण दिले. क्षणाचाही विलंब न लावता पंकजाताई यांनी हे निमंत्रण स्विकारले. डाॅ. खाडे व त्यांच्या पत्नी सौ. खाडे यांनी त्यांचे कौटुंबिक स्वागत केले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मनमोकळ्या गप्पांमध्ये लोकनेते मुंडे साहेबांच्या सहवासातील आठवणींना डाॅ. खाडे यांनी उजाळा दिला. खाडे कुटुंबाच्या स्वागताने पंकजाताईही भारावून गेल्या. बाहेरच्या राज्यात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील भूमिपुत्रांशी, आपल्या माणसांशी असलेले ऋणानुबंध इतक्या दूरवरही त्यांनी जपल्याचे या भेटीवरून लक्षात येते.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!