Uncategorized

पुन्हा एखदा भरधाव राखेच्या टिपरने दुचाकीस्वाराला चिरडले आपघातात बाबू निरडे जागीच ठार


दिंद्रुड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : भरधाव टीपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात गुरुवारी (दि.24) सायंकाळी तेलगाव- दिंद्रुड महामार्गावर झाला. बाबू आबाजी निरडे (वय 52) असे त्यात मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातानंतर हर्धव टीपर रस्त्यालगतच्या लिंबाच्या झाडाला धडकल्याने झाड उन्मळून पडले.

बाबु आबाजी निरडे हे दुचाकीवरुन (एमएच 44 ई 6474) आपल्या गावी कचारवाडीकडे परतत होते. याच दरम्यान, परळीकडून भरधाव वेगात येणार्‍या राखेची वाहतूक करणार्‍या टिप्परने (एमएच 22 एए 554 ) नर्मदा जिनिंगजवळ त्यांना जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार निरडे टिप्परच्या खाली चिरडून जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वारास चिरडल्यानंतर अनियंत्रित टिप्पर महामार्गाशेजारील लिंबाच्या झाडावर आदळला. यात लिंबाचे झाड मुळासकट उन्मळून पडले आहे. अपघाताची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह धारुर येथील शासकीय रुग्णालयात हलवला होता. अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!