बीड

खासबाग देवी ते मोमीनपुर्‍याला जोडणार्‍या बंधारा कम पुलाचा प्रश्न मार्गी, आ.संदिप भैय्या क्षीरसागरांच्या प्रयत्नाला यश; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तत्वत: मान्यता

कामाचे उद्घाटन करण्यास येणार असल्याचे मंत्री जयंत पाटील यांची आ. संदिप क्षीरसागर, माजी सय्यद सलीम यांना ग्वाही

बीड (प्रतिनिधी):- शहरातील महत्त्वाच्या असलेल्या बिंदूसरा नदीवरील खासबाग ते मोमीनपुर्‍याला जोडणार्‍या बंधारा कम पुलाचा प्रश्न मार्गी लागला असून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तत्त्वत: मान्यता देत या कामाचे उद्घाटन करण्यास मी बीडला येणार असल्याची ग्वाही आ.संदिप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम यांना दिली. खासबाग ते मोमीनपुर्‍याला जोडणारा बंधारा कम पुल करण्यात यावा या आ.संदिप क्षीरसागरांच्या मागणीला आता यश आले असून सदर बंधारा कम पुल झाल्याने मोमीनपुर्‍यासह पेठ बीड व शहरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

बीड शहरातून बिंदूसरा नदी वाहते,या नदीवर खासबाग देवी ते मोमीनपुरा बंधारा कम पुल करण्यात यावा त्याचबरोबर बिंदूसरा नदी सिंचन आणि पर्यटनच्या दृष्टीने विकास करण्यात यावा नदीचे संवर्धन, पुर संरक्षक भिंत, सुशोभीकरण व पर्यटनच्या दृष्टीने विकास करण्यात यावा अशी मागणी आ.संदिप क्षीरसागर यांनी विधानसभा सदस्य झाल्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती या बाबत सातत्याने पाठपुरावा त्यांचा सुरू होता. बिंदूसरा नदीवर खासबाग देवी ते मोमीनपुरा जोडणारा रस्ता व पुल करण्यात यावा अशी मागणी मोमीनपुरा भागातील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षापासून होत होती, सदरील बंधारा कम पुलाचा प्रश्न आता मार्गी लागला असून खासबाग ते मोमीनपुर्‍याला जोडणार्‍या बंधारा कम पुलाचे काम सुरू होईपर्यंत आ.संदिप क्षीरसागर यांची सातत्याने धडपड दिसून येईल. बिंदूसरा नदीवरील बंधारा कम पुलाच्या अंदाजपत्रकास प्रादेशिक कार्यालय मुख्य अभियंता (ज.स.) जलसंपदा विभाग औरंगाबाद यांनी त्यांचे पत्र ता.शा.7/2337/2019 अन्वये 27 कोटी 28 लक्ष 66 हजार 247 किंमतीस तांत्रिक मान्यता प्रदान केली आहे. या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देवून विशेष बाब म्हणून खासबाग देवी ते मोमीनपुर्‍याला जोडणार्‍या बंधारा कम पुलाच्या कामास सोमवार दि.14 डिसेंबर 2020 रोजी जलसंपदा जयंत पाटील यांनी तत्त्वत: मान्यता देवून निविदा प्रक्रिया राबवून काम हाती घेण्याचे निर्देश दिलेे आहेत. आ.संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना हे मोठे यश असून हा प्रश्न मार्गी लागल्याने शहरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. या वेळीच आ. संदिप क्षीरसागर यांच्या समवेत माजी आ. सयद सलीम ,माजी जि. प सदस्य मदन जाधवसयाजी शिंदे, उपस्थित होते

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!