बीड

आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांची विधानमंडळाच्या अल्पसंख्यांक,आहार व्यवस्थापन समितीवर सदस्यपदी निवड


बीड, 6 ऑक्टो :- महाराष्ट्र विधानसभा विधानमंडळाच्या विविध समित्यांवर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन 2020-21 साठी विधानसभा सदस्यांची नियुक्ती केली आहे. बीड विधानसभेचे आमदार संदिप भैय्या क्षीरसागर यांची विधानमंडळाच्या अल्पसंख्यांक कल्याण समिती विधानसभा नियम 224-ण आणि आहार व्यवस्था समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. अल्पसंख्यांक कल्याण समितीच्या माध्यमातून अल्पसंख्यांक सामाजातील प्रश्न सोडवण्याबरोबरच मंत्रालय, विधानमंडळ येथील आहार व्यवस्थापनाबाबत अडीअडचणी सोडवण्याची संधी या दोन समितीच्या माध्यमातून आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांना मिळाली आहे. 
सन 2020-21 या वर्षासाठी विधान मंडळाच्या विविध समित्यांवर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दि.5 नोव्हेंबर रोजी विधानसभा सदस्यांची नियुक्ती केली आहे. या संयुक्ती समित्यातील अल्पसंख्यांक कल्याण समिती विधानसभा नियम 224-ण या समिती प्रमुखपदी अमिन पटेल यांची निवड केली असून सदस्य म्हणून बीड विधानसभेचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मंत्रालय आणि विधानमंडळ या संदर्भात असलेल्या आहार व्यवस्थापन समितीवर प्रमुख म्हणून राजन साळवी यांची निवड करण्यात आली असून सदस्य म्हणून आ.संदिप क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच बरोबर अंदाज समिती, लोक लेखा समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, पंचायतराज समिती, रोजगार हमी योजना समिती, उपविधान समिती, अनुसूचित जाती कल्याण समिती, अनुसुचित जमाती कल्याण समिती, विमुक्त जाती व भटक्या कल्याण समिती, महिला व बालकांचे हक्क कल्याण समिती, इतर मागासवर्गीय कल्याण समिती, मराठी भाषा समिती, अशासकीय विधेयक व ठराव समिती, ग्रंथालय समिती, आमदार निवास समिती व इतर समित्यांच्या निवडी जाहिर झाल्या असल्याचे महाराष्ट्र विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांनी याबाबतचे आदेश निर्गमीत केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!