बीड

बीड जिल्हा खाकीत मोठे फेरबदल, पोलीस अधीक्षकांनी त्या अधिकाऱ्यांवर सोपवली नवी जबाबदारी


बीड, 6 ऑक्टोबर : सुरवातीला एसपी, एएसपी पुन्हा पोलीस उपअधीक्षक आणि आता पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या झाल्या आहेत, बदलून आलेल्या अधिकाऱ्यांची दखल घेऊन पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी त्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे, त्यानुसार बीड शहर ठाण्यास पोलीस निरीक्षक रवी सानप, बीड ग्रामीणला पोलीस निरीक्षक संतोष साबळे , माजलगाव शहरला पोलीस निरीक्षक धनंजय फराटे , आष्टी या ठिकाणी पोलीस निरीक्षक सलीम अमर चाऊस , बीड शिवाजी नगर या ठिकाणी साईनाथ ठोंबरे, मानव संसादनला पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांची बदली करण्यात आली आहे, तसेच सपोनि प्रफुल्ल साबळे यांची गेवराई, महेश आंधळे यांची पाटोदा, मुस्तपा इस्माईल शेख यांची बीड शहर, शंकर शिंदे यांची आरसीपी बीड प्रभारी, नितीन मिरकर यांची वडवणी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे पोलीस उप निरिक्षक भास्कर कांबळे यांची वाचक उपविपोअ माजलगाव, मारोती माने यांची वाचक उपविपोअ केज, रवींद्र नागरगोजे यांची कोर्ट पैरवी अधिकारी बीड, शिवाजी भारती यांची अनै.मा. वा. प्र.कक्ष बीड, प्रकाश कवठेकर यांची जिल्हा विशेष शाखा बीड, भागतशिंग दुल्लत यांची एलसीबी बीड, अर्जुन चौधर यांची कोर्ट पैरवी अधिकारी अंबाजोगाई, गणपत जागडे यांची वाहतूक शाखा बीड, निशिगंधा खुळे यांची सायबर पोस्ट बीड अश्या बदल्या करण्यात आल्या आहे, यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी 5 नोव्हेंबर रोजी ऑर्डर काढली असून तात्काळ रुजू होऊन अहवाल सादर करा अश्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!