बीड

नवरात्रोत्सवात कशी करणार घटस्थापना; जानून घ्या मुहूर्त

बीड, दि.16 (लोकाशा न्युज) ः सर्वांचे वेध लागून राहिलेल्या नवरात्रोत्सवास आज दि.17 ऑक्टोंबरपासून सुरूवात होत आहे. या पार्श्‍वभुमीवर आज घटस्थापना होत असून घटस्थापनेचा योग्य मुहूर्त आपण जानून घेवूत.
अश्विन शुध्द प्रतिपदा, शनिवार दि.17 ऑक्टोबर 2020 ला प्रतिपदा तिथी सूर्योदयापासून ते रात्री 09:07 पर्यंत आहे. तसेच सूर्योदयापासून चित्रा नक्षत्र 11:49 पर्यंत आहे. नंतर स्वाती नक्षत्र आहे. योग विष्कण्भ 21:12 पर्यंत आहे. शारदीय नवरात्राचा आरंभ, घटस्थापना शुद्ध प्रतिपदा शनिवारी होत आहे. नवरात्रातील स्थापना पूजन इत्यादी आपल्या कुलाचार याप्रमाणे करावे. त्यायोगे घरात सुख-समृद्धी नांदते. अखंडदीप, दुर्गा सप्तशती पाठ नवचंडी होम-हवन नवमीचे किंवा अष्टमीच्या दिवशी कुमारी पूजन इत्यादी करण्याचा कुळाचार अनेक कुटुंबात परंपरेने चालत आलेला असतो ते सर्व श्रद्धापूर्वक करावेत.

शुभ मुहूर्त :-स.08:00 ते स.09:30
पर्यंत आहे. याकाळात घटस्थापना करु शकता.
लाभ मुहूर्त :- दु.02:00 ते दु.03:30 पर्यंत आहे. याकाळात घटस्थापना करु शकता किंवा अमृत मुहूर्त :- दु.03:30 ते दु.05:00 पर्यंत आहे. याकाळात घटस्थापना करु शकता. किंवा गोरज मुहूर्त
लाभ मुहूर्त :- रात्री 06:30 ते रात्री 08:00 पर्यंत आहे. याकाळात घटस्थापना करु शकता. राहु काल :- सकाळी 9:00 ते 10:30 या काळात घटस्थापना करु नये.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!