बीड

खंडणी मागणार्‍या दोन पत्रकरांवर गुन्हा दाखल

अंबाजोगाई, दि.15 (लोकाशा न्युज) ः अंबाजोगाई पंचायत समिती कार्यालयातील कर्मचार्‍यास 10 हजार रुपयांची मागणी करून धमकावल्या प्रकरणी दर्पण न्यूज या युट्युब चॅनलचे परमेश्वर सोनवणे वकॅमेरा मॅन यशवंत सोनवणे या दोघांच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी व खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी पंचायत समीती कार्यालय अंबाजोगाई येथे कनिष्ठ आरेखक म्हणुन कार्यरत असलेले संतोष मनोहर काळे यांनी अंबाजोगाई पोलिसात दिलेल्या तक्रारी वरून काळे यांचेकडेसन 2015 पासुन तालुक्यात पंचायत समीती अंतर्गत बांधकाम झालेली नोंदणी करणे, रोजगार हमी योजने अंतर्गत योजनेची नोंदणी करणे इत्यादी कामे असुन काल15 ऑक्टोबर रोजी दुपारी 03.00 वाजण्याच्या सुमाराससंतोष काळे,कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक विल्सन अनंत तुला, कनिष्ठ अभियंता कालीदास कुलकर्णी हे पंचायत समीती कार्यालयात काम करत असताना त्यांचे टेबलवर दर्पण न्युज या युट्युब चॅनेलचे परमेश्वर हरीदास सोनवणे व त्याचे सोबत कॅमेरा मॅन यशवंत सोनवणे हे आले व त्यांनी काळे यांना तुम्ही शासनाचे कामे निट करत नाहीत मी तुमची रेकॉर्डीग करुन बातमी लावतो माझे काय आहे ते बघा व मला महीन्याला 10,000 रु द्या. मी तुमची बातमी लावत नाही असे म्हणताच काळे त्यास म्हणाले की मी कनिष्ठ कर्मचारी आहे. मी कोणतेही काम खोटे करत नाही व मी तुम्हाला पैसे देवु शकत नाही त्यावर सोनवणे याने मी तुझी वाट लावतो तुझी नोकरी घालवतो असे म्हणुन सोनवणे याने काळे याचे टेबलवरील नोंदवही रजीस्टर फेकुन दिले व तुझी बघतो असे म्हणुन काळे याचे शर्टचे कॉलरला पकडुन त्याचे सोबतचे माणसाने काळे यास चापटाने मारहान केली त्यावेळी तेथे कार्यालयातील सहाय्यक गटविकास अधिकारी विवेकानंद कराड, कक्ष अधिकारी निळकठ दराडे यांनी भांडणाची सोडवा सोडव केली. या यापुर्वीही सोनवणे याने वेळोवेळी कार्यालयात येवुन कार्यालयातील कर्मचारी यांना पैशाची मागणी केली असल्याचेतक्रारीत म्हंटले असुन या प्रकरणी संतोष मनोहर काळे यांच्या फिर्यादी वरूनदर्पण न्युज या युट्युब चॅनलचे परमेश्वर हरीदास सोनवणे व यशवंत सोनवणे याचे विरुद्ध शासकीय कामात अडथळा व खंडणी मागितल्या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये गु र न 440/2020 कलम 353, 385, 323, 32 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पो नी सिद्धार्थ गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नी सूर्यवंशी हे अधिक तपास करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!