बीड

जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; पुढील ऐवढ्या दिवस राहणार पाऊस

जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेच्या सुचना


बीड, दि.14 (लोकाशा न्युज) प्रादेशिक हवामानशास्त्र मुंबई केंद्राच्या वतीने दि. 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत बीडसह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विजेच्या कडकडासह मुसळधार व अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने बीड जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशा सुचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लॅडलाईन फोनचा वापर करू नका, शॉवरखाली अंघोळ करू नका, घरातील बेसिनचे नळ पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका, विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असतांना लोखंडी धातुच्या सहायाने उभारलेल्या तंबुमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेवू नका, उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका, धातूच्या उंच मनोन्याजवळ उभे राहू नका, घराच्या खिडकीतून वीज पडतांना पाहू नका असे आवाहन करण्यात आले आहे.

हे करा

विजेच्या गडगडाटासह पावसाची पुर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा, जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा, आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या, घराच्या बाल्कनी छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका, विद्युत उपकरणे बंद करा, तारांचे कुंपन विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तुपासून दूर रहा, पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!