बीड

खा.प्रीतमताईंच्या प्रयत्नांना यश, अखेर सोलापूर-तुळजापूर-बीड-जळगाव रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण


बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मराठवाड्याला जोडणार्‍या महत्वपूर्ण सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-बीड-जळगाव या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. यासंदर्भात बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सतत पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून सदरील रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. हा रेल्वे मार्ग मराठवाडा व प्रामुख्याने बीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्यामुळे खा.प्रितमताई मुंडे यांनी पाठपुरावा करताना सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा व वेळेत सर्वेक्षण पूर्ण व्हावे यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालय व संबंधित विभागांकडे पत्र व्यवहार केला होता.त्यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!