बीड : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे परत मराठा समाजातील युवक आत्महत्या करु लागले आहे. काल तालुक्यातील केतुरा येथील एका १८ वर्षीय युवकांना आरक्षण नसल्यामुळे आत्महत्या केली. याची माहिती मिळताच अण्णासाहेब अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केतुरा येथे जाऊन रहाडे कुटूबांची भेट घेत जमलेल्या युवकांना हात जोडुन विनंती केली की बाबांनो यापुढे आत्महत्या सारखे टोकाचे निर्णय घेऊ नका.
अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे आज पासुन बीड जिल्ह्याच्या दोन दिवशीय दौर्यावर आहेत. त्यांना विवेक रहाडे या मराठा समाजातील युवकांने केलेल्या आत्महत्येची माहिती मिळाल्या नंतर त्यांनी सर्व प्रथम रहाडे कुटूबांची भेट घेत, त्यांना आधार दिला. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले कि बाबांनो आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल टाकु नका, आपण सर्व मिळुन आंदोलने करु, उपोषण करु पण यापुढे कूणीही आत्महत्या करु नका असे आव्हान त्यांनी यावेळी केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश पोकळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.