बीड

जिल्हा पोलिस दलात मोठी खांदेपालट, तत्कालीन एसपी हर्ष पोद्दार यांच्यानंतर asp विजय कबाडे यांच्यासह त्या dysp च्याही झाल्या बदल्या


बीड, 1 : बीड जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत, काल ग्रह विभागाने केलेल्या बदल्यात बीडचे तत्कालीन एसपी हर्ष पोद्दार यांच्यानंतर बीडचे asp विजय कबाडे यांची नांदेडला बदली करण्यात आली आहे, त्यांच्या जागी नाशिक येथून सुनील लांजेवार येणार आहेत, माजलगावचे dysp श्रीकांत डीसले यांची नागपूर येथील प्रशिक्षण विद्यालयात बदली करण्यात आली आहे, त्यांच्या जागी कळंबचे सुरेश पाटील येणार आहेत, अंबाजोगाईचे dysp राहुल धस यांची दौडला बदली करण्यात आली आहे, त्यांच्या जागी भोकरदनचे सुनील जायभाय हे येणार आहेत, तर बीडला dysp म्हणून मुंबईवरून संतोष वाकळे हे येणार आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!