स्पोर्ट्स

केकेआर पहिल्या सामन्यासाठी सज्ज; या खेळाडूला रोखण्याचा मुंबईचा प्लॅन

 दुबई, दि. २३ : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीझनमधील पाचवा सामना आज कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये रंगणार आहे. सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाचा सामना करणारा संघ मुंबई इंडियन्स आयपीएलच्या या सीझनमधील आपला पहिला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर कोलकत्ता आज यंदाच्या सीझनमधील पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. आयपीएल 2020 जिंकण्यासाठी केकेआरने काही खास बदल आपल्या संघात केले आहेत. धडाकेबाज खेळाडू आंद्रे रसेलला पहिल्या फळीत खेळवण्याचा विचार केकेआर करत असल्याचे संकेत संघाच्या वतीने देण्यात आले आहेत. तर केकेआरचं हे चक्रव्यूह भेदण्यासाठी आणि आक्रमक रसेलला रोखण्यासाठी मुंबई इंडियन्सनेही खास प्लान तयार ठेवला आहे. कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याआधी रसेल आपल्यासाठी सर्वात मोठं आव्हान असल्याचं सांगितलं आहे. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज बोल्टने सांगितलं की, ‘सध्या आंद्रे रसेल टी20 मधील सर्वात खतरनाक फलंदाज आहे. आणि तेच आव्हान आहे. म्हणूनच मी हा खेळ खेळतो. मला मोठ्या खेळाडूंचं आव्हान स्विकारण्याची आणि त्यांचे विकेट्स घेण्याची इच्छा आहे. मी हे आव्हान स्विकारण्यासाठी तयार आहे.’

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!