स्पोर्ट्स

आयपीएल धमाका; कधी अन कोठे पाहाल पहिला सामना

दिल्ली, दि. १९ (लोकाशा न्यूज) : ‘आयपीएल’चा १३ वा हंगाम यावर्षी ३० मार्चपासून प्रारंभ होणार होता, परंतु करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वप्रथम १५ एप्रिलपर्यंत ही स्पर्धा लांबणीवर पडली. त्यानंतर मात्र ही स्पर्धा रद्द होण्यापर्यंतच्या चर्चाना सुरुवात झाली. मात्र ‘बीसीसीआय’ने कठीण काळातही स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले. अमिराती क्रिकेट मंडळाच्या साथीने यंदा प्रथमच रिकाम्या स्टेडियम्समध्ये ही स्पर्धा होणार आहे. ‘आयपीएल’च्या पहिल्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत.

कधी अन कोठे पाहाल सामना
आज, शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २ आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी १ या वाहिन्यावर सामना पाहता येईल. शिवाय Disney+Hotstar VIP वरही ऑनलाइन सामना पाहू शकता.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!