मुंबई, दि. 17 (लोकाशा न्यूज): भारतात 22 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता Poco X3 लॉन्च होणार आहे. याचा खुलासा ट्विटरवर करण्यात आला आहे. Poco X3 हा गेल्या आठवड्यात युरोपात लॉन्च झालेल्या पोको एक्स 3 एनएफसीचा थोडा ट्विस्टेड व्हेरियंट असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, ट्वीटमध्ये फोनबाबत जास्त माहिती देण्यात आलेली नाही. फ्लिपकार्टच्या वतीने टीझर पेजमध्ये Poco X3 एनएफसी प्रमाणेच स्नॅपड्रायगन 732 जी SoC असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच आतापर्यंत हे स्पष्ट झालं नाही की, Poco X3 साठी एखाद्या लॉन्च इव्हेंटचं आयोजन करण्यात येणार की, फक्त घोषणा होणार. पोको इंडियाने ट्विटरवर शेअर केलं आहे की, 22 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता भारतात Poco X3 लॉन्च करण्यात येणार आहे. पोको इंडियाच्या वतीने शेअर करण्यात आलेल्या 10 सेकंदांच्या टीझर व्हिडीओमध्ये फोनची फ्रंट आणि बॅक साइड दिसत आहे. ज्यामध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी एक क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. इतर पोको फोन मॉडलप्रमाणे Poco X3 देखील फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
Poco X3 specifications
Poco X3 एनएफसीच्या तुलनेत Poco X3 ची बॅटरी अधिक क्षमतेची असल्याचं बोललं जात आहे. हेदेखील सांगण्यात येत आहे की, 8 जीबी रॅम व्हेरियंटसोबत लॉन्च होऊ शकतो. जर इतर स्पेसिफिकेशन्स समान असले तर Poco X3 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसोबत 6.67-इंचाचा फुल-एचडी + डिस्प्ले असणार आहे. तसेच हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 732G SoC देण्यात येऊ शकतो.
फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे, ज्यामध्ये 64-मेगापिक्सलचा सोनी IMX682 प्रायमरी सेंसर, 13-मेगापिक्सलचा 119-डिग्री वाइड-अॅगल सेंसर, 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 2-मेगापिक्सल का मॅक्रो शूटरचा समावेश आहे. फ्रंट साइडला सेल्फीसाठी 20-मेगापिक्सलचा सेंसर असण्याची शक्यता आहे. तसेच फोन 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करणार असून यामध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे.