बीड

…तर कर्जदारांचा प्रस्ताव होणार ब्लॅकलिस्ट

लाभार्थ्याला तीन महिणे दाखल करता येणार नाही कर्ज प्रस्ताव


बीड, दि. 15 : मराठा समाजासाठी आण्णासाहेब पाटलांनी मोठे योगदान दिलेले आहे, आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हेही धडाडीने काम करत आहेत. सध्या त्यांच्याच नेतृत्वात मराठा समाजातील तरूणांना वेगवेगळ्या उद्योगात आपले करिअर करण्याची मोठी संधी मिळत आहे, नुकतीच अण्णासाहेब पाटील महामंडळाची बैठक पार पडली असून यामध्ये नरेंद्र पाटलांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

10 सप्टेंबर रोजी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची 72 वी बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये महामंडळाच्या लाभार्थ्यांकरीता उत्पन्नाचा आणि जातीचा पुरावा अनिवार्य करण्याबाबतच्या विषयावर चर्चा करून महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महामंडळाच्या यापुर्वीच्या अटी व शर्तीप्रमाणे यापुढे देखील लाभार्थ्यांकरीता उत्पन्नाचा पुरावा म्हणून उत्पन्नाचा दाखला (शासनाने/तहसिलदारांनी प्रमाणित केलेला) किंवा आयटी रिर्टन फाईल यापैकी कोणताही एक पुरावा अपलोड करण्याची मुभा असेल. मात्र इत्यादी पुराव्यांमध्ये जर कोणीही खाडाखोड वा इतर कोणताही बदल केल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधित लाभार्थ्यांला महामंडळाच्या योजनेअंतर्गत पुढील 3 महिन्यांकरीता अर्ज करता येणार नसून त्यांना 3 महिण्यांकरीता ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महामंडळाच्या यापुर्वीच्या अटी व शर्तीप्रमाणे यापुढे देखील लाभार्थ्यांकरिता जातीचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जातीचा दाखला यापैकी कोणताही एक पुरावा अपलोड करण्याची मुभा असेल, मात्र इत्यादी पुराव्यांमध्ये जर कोणीही खाडाखोड वा इतर कोणताही बदल केल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधित लाभार्थ्यांला महामंडळाच्या योजनेअंतर्गत पुढील 3 महिण्यांकरीता अर्ज करता येणार नसून त्यांना 3 महिण्यांकरिता ब्लॅकलिस्ट करण्यात येईल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!