बीड

४४ कामासाठी नगरअध्यक्षांनी आणले साडे आठ कोटी

बीड दि.15 (प्रतिनिधी)ः- बीड नगर परिषद अंतर्गत विविध प्रभागामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत साडे आठ कोटींच्या 44 विकास कामांची लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजने अंतर्गत बीड शहरात सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली बांधकाम, डांबरीकरण, संरक्षण भिंत, व्यायाम शाळा आदिंची कामे प्रस्तावित करण्यात आली होती ती मंजूर झाली असून शहरातील 44 ठिकाणी ही कामे सुरू होणार आहेत. वार्ड क्र.4 सिमेंट रस्ता बांधकाम करणे, वार्ड क्र.24 क्षीरसागर यांच्या घरापासून ते जाधव यांच्या घरापर्यंतचा सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, वार्ड क्र.24 मध्ये सह्याद्री गॅरेज ते एकता नगर सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, वार्ड क्र.13 चर्‍हाटा रोड ते शेख अतिक यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम तसेच पाण्याची टाकी ते धानोरा रस्ता व अन्य पाच ठिकाणी रस्ता व नाली बांधकाम वार्ड क.13 मध्येच संभाजी नगर, करपरा नदीस संरक्षण भिंत बांधकाम करणे तसेच विश्राम गृह ते माने कॉम्प्लेक्स डांबरीकरण रस्ता करणे, वार्ड क्र.24 गुजर कॉलनी ते भगवान विद्यालय सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम, वार्ड क्र.3 मध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम. याच ठिकाणी वसंत कुलकर्णी यांच्या घरापासून ते परळकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, रमेश लोंढे यांचे घर ते राम तांबे यांच्या घरापर्यंत, रामतीर्थ येथे सिमेंट रस्ता नाली बांधकाम, हनुमान नगर ते हातांगळे यांचे घर, योगेश्‍वरी ब्युटी पार्लर ते तिरूमला ऑफिस, शाम आसने यांच्या घरापासून नवीन मोंढा रोड (हनुमान नगर) सिमेंट रस्ता नाली बांधकाम, बियाणी यांच्या घरापासून मोंढा पुलापर्यंत सिमेंट रस्ता नाली बांधकाम, वार्ड क्र.4 दिनकर दहिवाळ यांचे घर ते मश्जिद पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, दुबे कॉलनी काळे यांच्या घरापासून बुरांडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, नागोबा गल्ली येथे व्यायाम शाळा बांधकाम करणे तसेच महामुने यांच्या घरापासून वसंत चांदणे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम, एकता नगर या ठिकाणी निर्मळ यांच्या घरापासून ते ईनकर यांच्या घरापर्यंत, कैलास ठोकळ यांच्या घरापासून ते कोरडे यांच्या घरापर्यंत, सौदागर जाधव यांच्या घरापासून ते मोटे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, वार्ड क्र.22 मध्ये ठोंबरे यांच्या घरापासून शिंदे यांचे घर व मांडवे यांच्या घरापासून काळे यांचे घर, उपरे यांच्या घरापासून ते जगदाळे यांच्या घरापर्यंत आदर्श कॉलनी सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे, याच वार्ड मधील सावतानगर पुर्व पंडित यांच्या घरापासून गोदावरी निवास, गणेश शेठ ते तुकाराम तांदळे – गोरवे मारोती निवास ते मुरकुटे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधाकम, कृषि कॉलनी मुख्य रस्त्यापासून तुळजाई निवास ते गावंडे निवास सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, वार्ड क्र.13 मध्ये बार्शी रोड ते मा.न्यायाधीश निवासस्थान ते दिव्या गार्डन पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, याच ठिकाणी वनवे यांच्या घरापासून नाट्यगृह मुख्य रस्त्यापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम तसेच बहीर यांच्या घरापासून ते बिडवे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, वार्ड क्र.2 मध्ये स्नेह नगर ते बहीर बापू यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता नाली बांधकाम, आखाडे यांच्या घरापासून ते घाडगे यांच्या घरापर्यंत, वनवे यांच्या घरापासून ते शिंदे यांच्या घरापर्यंत, कुलकर्णी यांच्या घरापासून क्षीरसागर यांच्या घरापर्यंत, घाडगे यांच्या घरापासून ते शिंदे यांच्या घरापर्यंत, आखाडे यांच्या घरापासून बांगर यांच्या घरापर्यंत, शाबूनकर यांच्या घरापासून कवचनकर यांचे घर, जनाबाई थोरात यांच्या घरापासून राधाकिसन राऊत यांचे घर, अंदुरे यांच्या घरापासून बन्सोडे यांच्या घरापर्यंत, माने किराणा ते प्रेम जाधव, गायसमुद्रे यांच्या घरापासून पॅराडाईज दवाखाना, तौफिक यांचे घर ते मसरत नगर, जानवळे हॉस्पिटल ते सिद्दीकी यांचे घरापर्यंत, ससाणे यांच्या घरापासून अशोक टल्ले यांच्या घरापर्यंत, अपना किराणा ते आबेदा मश्जिद, आबू सलाम शेख यांच्या घरापर्यंत, जाधव यांच्या घरापासून ते गुजराती कॉलनीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम अशा 44 विकास कामांची लवकरच सुरूवात होणार असून ही सर्व कामे दर्जेदार करून घेण्यात येणार आहेत. साडे आठ कोटी रूपये खर्चाची ही कामे असून शहरातील अन्य भागातील विकास कामाचे प्रस्ताव लवकरच मंजूर होणार आहेत अशी माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!