बीड, दि. १५ (लोकाशा न्यूज) : मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्य न्यायालयात आलेली स्थगिती धक्कादायक असून यातून लाखो मराठा युवकाच्या भविष्याची वाताहत होणार आहे आणि यासाठी हे सरकार जबाबदार असल्याची घणाघाती टीका आ विनायक मेटे यांनी केली . शिवसेना हा आरक्षणाला विरोध असणारा पक्ष असून या पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक विरोध असल्याचे म्हटले, शरद पवार यांचा राष्ट्रवादी व थोरात यांचा काँग्रेस प्रस्थापित लोकांचा पक्ष आहे यांना विस्थापित पोरांना प्रवाहात याना येऊ द्यायचे नाही . गरीब मराठा युवकांची वाताहत या तीन पक्षाच्या सरकार मुळे झाल्याचे ते म्हटले.
मराठा आरक्षण प्रश्न वर आ विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषद घेतली ते काल चाकूर येथील किशोर कदम यांच्या घरी भेट घेऊन आल्या नंतर बोलत होते . आरक्षण मुळे गरीब मराठा समाजातील युवा स्थिरावणार असल्याने काहींना ते नको होते , अशोक चव्हाण यांना कोर्टाची तारीख माहीत नव्हती या पेक्षा मोठे दुर्दैव नाही . सरकारचा प्रतिनिधी तारखेला उपस्थित नसावा हे लाजिरवाणे आहे . अनुभवी वकील नेमले नाहीत, सुनावणी वेळी न्यायालयाने गायकवाड अहवाल इंग्रजीत मागवला मात्र अद्याप ते भाषांतर सर्वोच्य न्यायालयात दिले नाही , 4 मे चा जी आर जे कोविड संदर्भात होते नोकर भरती रद्द करण्याचा , तो मात्र गरज नसताना न्यायालयात दाखवला असा आरोप आ मेटे यांनी केला . स्थगिती देण्यासाठी सरकारने असे काम केले . तोंडाशी आलेला घास गेला आहे . आरक्षण घालण्याचे पाप आघाडी सरकारने केले आहे मला आरक्षण प्रश्नी राजकारण करायचे नाही मात्र काही उत्तरं समाजाला हवे असणार आहेत . भाषण बाजी करत आहेत सरकारने 6 दिवसात काय केले . पुनर्विचार याचिका करण्या ऐवजी मुख्य न्यायाधीश कडे अर्ज करावा अशी मागणी आपण केल्याची आ मेटे यांनी सांगितले . प्रवेश थांबले आहेत , नोकऱ्या देणे थांबले आहेत , 10 टक्के आर्थिक निकष वरील आरक्षण मध्ये मराठा समाजाला लाभ घेता येणार नाही असे महाराष्ट्र सरकारने निर्णय घेणे दुर्दैवी असल्याचे आ मेटे म्हटले , सारथी नावाची संस्था बंद केली आहे . यावेळी पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख सुधीर काकडे, बबन माने, अनिल घुमरे उपस्थित होते.