बीड

आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन करणे गणेश ढवळेंना भोवले

सोशल मिडीयावर पोष्ट टाकून जनतेत आणि रूग्णात निर्माण केली दहशत, नेकनूरपाठोपाठ आता बीड शहर ठाण्यातही ढवळेंवर गुन्हा दाखल



बीड, दि. 9 : कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्वत्र आपतकालीन कायदा लागू आहे. असे असतानाही सोशल मिडीयावर सातत्याने पोष्ट टाकून लिंबागणेश येथील गणेश ढवळेंनी समाजसेवेच्या नावावर जिल्हा आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन केली आहे. विशेेष म्हणजे त्यांनी टाकलेल्या या पोष्टमुळे जिल्ह्यातील जनतेत आणि रूग्णांमध्ये दहशत निर्माण होत आहे. याअनुषंगानेच त्यांच्याविरोधात जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांनी बीड शहर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ढवळेंवर शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाची डोळेझाक करून गणेश ढवळे हे चुकीच्या पध्दतीने आपला व्यवसाय चालवत असल्याचेही मागच्या दोनच दिवसांपुर्वी निर्देशनास आले होते, याअनुषंगानेच लिंबागणेश येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रतिभा रकटे यांनी नेकनूर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ढवळेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, येथील जिल्हा शासकिय रूग्णालयात मागच्या तीन वर्षांपासून जिल्हा शल्य चिकीत्सक म्हणून मी कार्यरत आहे. सध्या कोवीड 19 अनुषंगाने आपतकालीन परिस्थितीमध्ये शळिवशाळल रलीं लागू आहे. या परिस्थितीमध्ये एक एक रूग्णाचा व्यवस्थितीत उपचार करणे व एक एक मृत्यू टाळणे ही आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. सर्व जग या आजारामुळे भयभीत झाले आहे बीड जिल्ह्यातही रूग्ण संख्या वाढत आहे, त्याचअनुषंगाने जिल्हा रूग्णालय बीड येथे कोविड 19 चे रूग्ण शरीक होतात व बरे होवून परतही जताता, परंतू गेल्या काही दिवसांपासून लिंबागणेश येथील डॉ. गणेश ढवळे यांनी त्यांच्या फेसबूकवरून जाणून-बुजून आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन करून जिल्ह्यातील जनतेत व रूग्णांमध्ये दहशत निर्माण करणारे पोष्ट सर्वत्र पसरवून दहशत निर्माण केली आहे. तसेच आपल्या सोशल मिडीयातील पोस्टव्दारे कोवीड मृत्यू पावलेल्या रूग्णांची नावे जाहिररित्या प्रसारित केलेली आहे. कोवीड 19 अंतर्गत रूग्णांची नावे प्रसिध्द करणे ही कायदेशीररित्या गंभीर बाब आहे, अशी लिहलेली पोस्ट फेसबूक अँकाऊंट व व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर दि. 3 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11.8 वाजता व दुपारी 16.53 वा. अशा वेगवेगळ्या पोस्ट टाकल्या आहेत, मी आपत्ती व्यवस्थापन समितीचा सदस्य असून सरकारी काम करीत असताना जिल्हा रूग्णालय व आरोग्य यंत्रणेविरूध्द समाजामध्ये व्देषाची भावना निर्माण होवून जिल्हा रूग्णालय व आरोग्य यंत्रणेची समाजातील प्रतिमा मलीन करणे व विश्‍वासर्हता कमी करण्याच्या उद्देशाने जाणीवपुर्वक फेसबुक आकाऊंट व व्हाट्सअ‍ॅपवर पोष्ट टाकली आहे, या अनुषंगानेच डॉ. अशोक थोरात यांनी बीड शहर ठाण्यात डॉ. गणेश ढवळेंच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार गणेश ढवळेंवर बीड शहर ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 505 (2), 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कलम 51 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास एएसआय नरेश चक्रे हे करीत आहेत. विशेष म्हणजे मागच्या दोनच दिवसांपुर्वी गणेश ढवळेंवर नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. समाजसेवेच्या नावाखाली ते कोणावरही बिनबुडाचे आरोप करत आहेत. अशातच त्यांच्या लिंबागणेश येथील रूग्णालयाबाबत काही तक्रारी आरोग्य विभागाच्या हाती लागल्या होत्या, त्यानुसार वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रतिभा रकटे यांनी लिंबागणेश येथील डॉ. गणेश ढवळे यांच्या दवाखान्याची तपासणी केली, या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे नागरगोजे नामक व्यक्तीने तक्रार केली होती, ज्यावरून तपासणी करण्यासाठी डॉ. रकटे यांच्यासह शासकिय यंत्रणा गेली असताना डॉ. ढवळेंनी त्यांना अरेरावी केली. नोंदणी प्रमाणपत्र दाखवण्यास टाळाटाळ केली, विशेष म्हणजे रुग्ण आर्या नवनाथ ढास (रा मुळूक), शुभांगी संदीपान वायभट यांची कसल्याही प्रकारची चाचणी केली नव्हती . कोरोना काळात आवश्यक असलेल्या चाचण्या देखील केल्या जात नव्हत्या. व्यवस्थापन कायद्याचे उलंघन केले, वैद्यकीय व्यवसाय करताना मुंबई नर्सिंग होमची नोंदणी आवश्यक आहे ते नाही तरीही अंतररुग्ण सेवा चालू ठेवली, जो अत्यंत गंभीर गुन्हा असल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले, तसेच त्यांनी ओपीडी रजिस्टर ठेवलेले नाही, अधिकचा औषध साठा ठेवला आहे. डॉ. अर्चना ढवळे व गणेश ढवळे यांच्याकडे डिग्रीचे प्रमाणपत्र आढळून आलेले नाही, औषध निरीक्षक श्री आर बी डोईफोडे यांनी औषध साठा पाहणी करून चौकशी केली असता त्यांच्या म्हणण्यानुसार र्वीीसी अधिनियम 1940 च्या 18 ( ल) नुसार गणेश ढवळे गुन्ह्यास पात्र असल्याचे आढळून आले, त्यानुसार त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथ रोग कायदा 1897 नुसार कार्यवाही करावी, असे डॉ प्रतिभा रकटे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे, त्यानुसार ढवळेंवर मंगळवारी रात्री उशीरा नेकनूर पोलिस ठाण्यात आयपीसी 188, 269, 270, साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियमन 2,3,4 आणि डग्स् अ‍ॅण्ड कॉसमॅटीक अ‍ॅक्ट 18 आणि 28 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार केंद्रे हे करीत आहेत.

…यापुढे शांतता भंग करू नये, ढवळेंना
बजावली नोटीस

सदर प्रकरणी पोलिसांनी गणेश ढवळेंना 149 ची नोटीस बजावली
आहे. यापुढे शांतता भंग करू नये अशी समज गणेश ढवळेंना पोलिसांकडून देण्यात आली आली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!