देश विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक

आवाहन करत हॅकरने मागितले चक्क बिटकॉइन


नवी दिल्ली, 03 सप्टेंबर : देशात दररोज असंख्य सायबर गुन्हे घडत आहेत. आर्थिक फसवणुकीपासून ते सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्यापर्यंत. पण, आता चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ) यांच्या वैयक्तिक वेबसाईटचं narendramodi.in ट्विटर अकाऊंट (Twitter account) हॅक करण्यात आल्याची घटना घडली आहे. हॅकरनं नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेलं ट्विटर अकाऊंट हॅक केलं आणि पीएम केअर फंडासाठी डोनेशन म्हणून हॅकरनं चक्क बिटक्वाइन देण्याची मागणी केली. हॅकरनं हे ट्विट नंतर लगेच डिलीट करण्यात आलं.
कोरोना लॉकडाऊनमध्ये अचानक का आणि कसं वाढलं तुमचं वजन? सर्वेक्षणात समोर आली कारणं हॅकर्सनी मोदींच्या ट्विटर अकाऊंटवर लिहलं की, ‘कोविड -19 साठी पंतप्रधान मोदी रिलीफ फंडामध्ये आपण दान करावे असं मी आपणास अपील करतो’. रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना ट्विटरनेही पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक वेबसाइटची लिंक अकाऊंट असल्याची कबुली दिली आहे.

काय आहे बिटकॉइन?
गेल्या काही दिवसांमध्ये बिटकॉइन विषयी चर्चा वाढली आहे. बिटकॉइन हे एक व्हर्च्युअल चलन आहे. हे डॉलर, रूपये किंवा पौंड सारख्या अन्य चलनांमध्ये देखील वापरलं जाऊ शकतं. ऑनलाइन देयकाव्यतिरिक्त, डॉलर आणि इतर एजन्सीमध्येसुद्धा ते बदललं जाऊ शकतात. हे चलन 2009 मध्ये बिटकॉइनच्या रूपात वापरात आलं होतं. आज याचा वापर जागतिक पेमेंटसाठीही केला जात आहे.

अमेरिकन दिग्गजांचीही खाती झाली होती हॅक
याआधी अनेक दिग्गजांचे अकाऊंट हॅक करण्यात आले होते. अमेरिकेतील अनेक दिग्गज व्यक्तींची ट्विटर अकाउंट जुलैमध्ये हॅक झाली होती. यामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, जगातील सर्वात श्रीमंत आणि गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांचा समावेश होता. इतकंच नाही तर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार जो बिडेन यांचे ट्विटर हँडलही हॅक झाले होते. आयफोनचा निर्माता Apple ही हॅकर्सच्या ताब्यात आला होता. त्यावेळीसुद्धा, हॅकर्सनी बिटकॉइन चलन मागितले होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!