महाराष्ट्र

रोहित पवारांच्या नावाने नवी संघटना; रोहित म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांची तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ आहे. त्यांच्या नावाने एक अराजकीय संघटना स्थापन करण्यात आली आहे. मात्र या संघटनेला रोहित पवार यांनी विरोध केला आहे. हे योग्य नसल्याचं सांगत त्यांनी राष्ट्रवादीसोबत काम करण्याचं आवाहन केलं आहे. काही तरुणांनी एकत्र येऊन ‘रोहित पवार युवा ब्रिगेड’ अशा नावाने बिगर राजकीय संघटना स्थापन केली आहे. मात्र, हा निर्णय रोहित पवार यांना पटलेला नाही. त्यांनी तात्काळ ट्विट करून त्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, “माझ्यावर प्रेम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या नावे अराजकीय संघटना सुरू केल्याचं समजलं. या सर्वांना माझी विनंती आहे की,मी #NCP चा आमदार असताना अशी स्वतंत्र संघटना काढणं योग्य नाही. त्याऐवजी आपण एकत्रितपणे सामाजिक काम करत राहू. कार्यकर्ता म्हणून मीही नेहमीच तुमच्यासोबत राहील.” काही तरुणांनी एकत्र येऊन ‘रोहित पवार युवा ब्रिगेड’ नावाची अराजकीय संघटना स्थापन केली. या संघटनेची पदं आणि जबाबदाऱ्या वाटपाची काही पत्रं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. संघटनेचे कार्यालय औरंगाबादमध्ये असल्याचे पत्रकावरुन लक्षात येते. या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नवनाथ देवकते हे असल्याचं देखील यावरुन समोर आलंय.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!