बीड आष्टी

अन् आ. सुरेश धसांनी केली सायकलस्वारी

आष्टी, दि.25 (लोकाशा न्युज) ः बीड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर नेहमीच आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने ओळखले जाणारे आ. सुरेश धस काही दिवसांपुर्वी ढोल वाजवल्याने चांगलेच चर्चेत आले होतेे. त्यानंतर मंगळवारी त्यांनी सायंकाळी आष्टी शहरातील फुलेनगर येथे नागरिकांच्या समस्या आणि रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांनी बांधलेली घर पाहण्यासाठी चक्क सायकलवरुन फेरफटका मारला. शहरातील फुलेनगर येथे रमाई आवास योजनेंतर्गत अनेक घरकुल मंजूर झाली.लाभार्थ्यांनी देखील याचा लाभ घेत आपआपल्या परीने चांगली घरे बांधली. याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आग्रहाखातर बांधलेली घरे पाहण्यासाठी आ.सुरेश धस आपल्या निवासस्थानावरुन चक्क सायकलवरुन घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांनी फुलेनगर येथील घरकुलाची पाहणी करत नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेत त्यावर तात्काळ तोडगा देखील काढला. त्यामुळे नेहमीच राजकीय पटलावर चर्चेचा विषय ठरलेले धस मंगळवारी सायकलस्वारीने पुन्हा एकदा चर्चिले गेले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!