महाराष्ट्र

आज गणेश चतुर्थी; ‘हा’ आहे बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त!

मुंबई, दि.22 (लोकाशा न्युज) ः पंचांगानुसार, चतुर्थी 21 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजून 2 मिनिटांनी सुरु होणार असून 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच, गणेश चतुर्थीची पूजा दुपारच्या वेळीच करण्यात येते. कारण श्रीगणेशाचा जन्म दुपारच्या वेळी झाला होता. गणरायाच्या पूजेचा वेळ 22 ऑगस्टपर्यंत दुपारी 2 तास 36 मिनिटांपर्यंत आहे. 22 ऑगस्ट रोजी म्हणजेच, आज सकाळी 11 वाजून 06 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 42 मिनिटांपर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना करू शकता. पंचांगानुसार, 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजून 22 मिनिटांपासून ते संध्याकाळी 4 वाजून 48 मिनिटांपर्यंतचा मुहूर्तही अत्यंत शुभ आहे..

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!