बीड

वाळू माफियाला कलेक्टर, एसपींचा दणका

एमपीडीए कायद्याअंतर्गत गेवराईतील माफियाला हर्सूलच्या कारागृहात केले स्थानबध्द


बीड: अवैध धंद्यांबरोबरच अवैध कामांना जिल्हाधिकारी राहूल रेखावार आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचा पहिल्यापासूनच विरोध राहिलेला आहे. त्यामुळेच अशा लोकांवर ते दोघेही सातत्याने कडकपणे कारवाई करत आहेत. गुरूवारी गेवराईतील एका माफियाला हर्सूलच्या कारागृहात स्थानबध्द करून त्यांनी त्या माफियाला चांगलाच दणका दिला आहे. बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी शर्तीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे व वाळू माफियांचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून एमपीडीए कायद्याअंतर्गत बर्‍याच गुन्हेगारांवर व गुंडांवर कार्यवाही करण्याचे योजले आहे. यापुर्वी दोन वाळू माफियांना औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द केले आहे. या अनुषंगाने पोलिस अधीक्षकांच्या सुचनेवरून गेवराई ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम चोबे यांनी आठ ऑगस्ट 2020 रोजी नारायण राधाकिसन भुसारी (वय 32 रा. नागझरी ता.गेवराई) याच्याविरूध्द एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधिक्षकांच्या मार्फतीने जिल्हा दंडाधिकार्‍यांना सादर केला होता. सदर स्थानबध्द इसमाविरूध्द पोलिस ठाणे गेवराई व पोलिस ठाणे गोंदी (जि.जालना) येथे वाळू चोरीचे, शासकिय नौकरावर हल्ले व मारहानीचे गुन्हे दाखल आहेत. एकूण 10 गुन्ह्यांची नोंद पोलिस अभिलेखावर आहे. सदरील इसमावर वाळू चोरीचे गुन्हे असल्याने पोलिसांची त्याच्यावर करडी नजर होती, सदर इसमावर यापुर्वी सीआरपीसी कलम 107 प्रमाणे प्रतिबंध कार्यवाही करण्यात आली होती. परंतू सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता गुन्हे करण्याचे चालूच ठेवून होता. सदर प्रकरणात जिल्हादंडाधिकारी राहूल रेखावार यांनी दि. 18 ऑगस्ट 2020 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एमपीडीए कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्सूल कारागृहात हजर करून स्थानबध्द करण्याबाबत आदेशीत केले होते, त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम चोबे यांना दिल्या होत्या. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय खबर्‍याच्या आधारे सदर स्थानबध्द इसमास नागझरी फाटा (ता.गेवराई) येथून ताब्यात घेवून पोलिस ठाणे गेवराई येथे हजर केले व त्यानंतर योग्य पोलिस बंदोबस्तात हर्सूल कारागृह औरंगाबाद येथे दि. 20 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी तीन वाजून पाच मिनीटांनी हजर करून स्थानबध्द केले आहे. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत, पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम चोबे, सपोनि राजाराम तडवी, पोउपनि ुयुवराज टाकसाळ, अभिमन्य औताडे, नवनाथ गोरे, सुशेन पवार, अंकूश वरपे, आईटवार यांनी केलेली आहे. भविष्यातही वाळू चोरी करणारे व वाळूचा चोरटा व्यापार करणारे जास्तीत जास्त व्यक्तींवर व कायद्याला न जुमानणार्‍या व्यक्तीविरूध्द एमपीडीए कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिस अधीक्षकांनी दिले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!