किराणा दुकाने, मेडिकलसह किरकोळ विक्रीचे दुकाने सुरू राहणार
बीड, दि.20 (लोकाशा न्युज) ः सनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने सहा शहराला लॉकडाऊनमधून सुट दिली असून या ठिकाणी आता किराणा दुकाने, फळेभाजीपाला, दुध, मेडिकल, गणेश मुर्ती विक्रीचे दुकाने, पुजेचे साहित्य, हारफुलांंची दुकाने आदी किरकोळ विक्रीचे दुकाने सुरू करता येणार आहेत. दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेल्या शहरात बीड, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, आष्टीचा समावेश आहे.
हे दुकाने सुरू करता येणार नाहीत
जिल्हा प्रशासनाने सणासाठी वरिल दुकांने उघडण्यास परवानगी दिली असली तरी मिठाई, हॉटेल, सुशोभीकरण साहित्य विक्री व इतर प्रकारचे दुकाने उघडण्यास बंदी घातली आहे. वरील सहाही शहरातील लॉकडाऊन हा दि.21 ऑगस्टपर्यंत लागू असणार आहे. तोपर्यंत मिठाई, हॉटेल, सुशोभीकरण व इतर प्रकारचे दुकान उघडता येणार नाहीत.
अँटीजेन टेस्ट सुरूच राहणार
लॉकडाऊन असलेल्या बीड, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, आष्टी या शहरात सध्या अँटीजेन टेस्ट सुरू आहे. आता जिल्हा प्रशासनाने वरिल दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली तरी या शहरातील अँटीजेन टेस्ट सुरूच राहणार असल्याचे आदेशात नमुद केले आहे.