बीड, दि. १९ :-गणेशोत्सव साठी जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळे यांना परवानगी देण्याच्या दृष्टीने सहायक आयुक्त (धर्मादाय)कार्यालय २० ऑगस्ट २०२० पासून सुरु करण्यास सुरू करणेस परवानगी देण्यात आली आहे. 22 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव निमित्त श्रीगणेश प्रतिष्ठापना होणार असून जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळे यांना सहाय्यक आयुक्त धर्मदाय यांच्या मार्फत परवानगी घेणे आवश्यक आहे. या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त (धर्मादाय) कार्यालय सुरू करण्यास २० आॅगस्ट २०२० पासून परवानगी देण्यात आली असून या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी ओळखपत्राचा वापर करून दैनंदिन अंतर्गत कामकाज करू शकता. यावेळी कोविड १९ विषयी सर्व नियमांचे पालन करून कामकाज केले जावे असे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी प्रवीण धरमकर यांनी दिले आहेत. कोरोना विषाणू रुग्णांची संख्या बीड जिल्हयात मोठया प्रमाणात वाढ होत असल्यामुळे बीड, अंबाजोगाई, माजलगांव, परळी, केज व आष्टी हे 06 शहर 10 दिवसांकरिता दिनांक 12 पासून दिनांक 21 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत पूर्णपणे सर्व दृष्टीने बंद असून या कालावधीत अत्यावश्यक असे महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, आरोग्य , नगर विकास व महावितरण हे सहा विभाग सुरू ठेवण्यात आले होते. गणेशोत्सव निमित्त श्रीगणेश प्रतिष्ठापना होणार असून त्या दृष्टीने हे आदेश दिले आहेत.