बीड

मोठा दिलासा, आजही कोरोनामुक्त रूग्णांचे होणार व्दिशतक

228 रूग्ण बरे होवून घरी परतणार, कोरोनामुक्तमध्ये एकट्या बीडमधील 165 रूग्णांचा समावेश



बीड : एका बाजूने जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असली तरी दुसर्‍या बाजूने यातील बरे होणार्‍या रूग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे, मागच्या चार पाच दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात रूग्ण बरे होवून घरी परतत आहेत. कालच्याप्रमाणेच आजही कोरोनामुक्त रूग्णांचे व्दिशतक होणार आहे. आज जिल्ह्यातील 228 रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतणार आहेत. कोरोनामुक्तमध्ये सर्वाधिक म्हणजेच 165 रूग्ण बीड शहरातील आहेत, त्यापाठोपाठच आष्टी सहा, पाटोदा 1, शिरूर 3, गेवराई नऊ, माजलगाव 6, वडवणी 1, धारूर 2, केज 6, अंबाजोगाई 9, परळी 20 रूग्णांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 2682 रूग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे. सध्या 1138 जण उपचार घेत आहेत, 1473 रूग्ण बरे झालेले आहेत. तर 71 जणांचा मृत्यू झालेला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!