बीड

एसीबीचे दणक्यावर दणके, पंधरा हजाराची लाच घेताना दोघांना पकडले, मुख्य आरोपी डोंगरे फरार, बीडच्या नगर रचना कार्यालयातील कारवाईने लाचखोरांचे धाबे दणाणले

बीड ; येळंब घाट परिसरातील आर क्षेत्राचा अकृषिक परवाना काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यात तडजोडी अंती पंधरा हजारात ठरले. 15 हजाराची रक्कम घेतली, यात दोन जणांना (खासगी इसम) ताब्यात घेण्यात आले आहे. यातील मुख्य आरोपी फरार असुन तपास सुरु आहे. ही कारवाई बीड एसीबीचे प्रमुख शंकर शिंदे यांच्या टिमने केली असुन एसीबीच्या कारवाया वाढल्यामुळे लाचखोरांना धडकी भरली आहे.

यातील तक्रारदार यांचे यळंब घाट शिवार येथील गट क्रमांक 580 अ (1) मधील 20.50 आर क्षेत्राचा अकृषिक परवाना काढण्यासाठी अॅानलाईन अर्ज BPMS पोर्टलवर खाजगी इसम निलेश पवार यांचे मार्फतीने दाखल केला होता .
सदरचा प्रस्ताव उपविभागीय कार्यालय बीड यांचेकडुन पुढील कार्यवाही साठी नगर रचना कार्यालय बीड यांचे कडे अॅानलाईन प्राप्त झाल्यानंतर दि 26/03/2024 रोजी खाजगी इसम निलेश पवार यांनी तक्रारदार यांचेकडे लोकसेवक प्रशांत डोंगरे (सहाय्यक नगर रचनाकार, बीड) यांचे करीता 30 000 रुपयाची मागणी केली . तक्रारदार यांचे तक्ररीवरुन दि 02/04/204 रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता खाजगी इसम निलेश पवार यांनी लोकसेवक डोंगरे यांचे करीता 30 000 रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले . तसेच दिनांक 04/04/2024 रोजी लोकसेवक प्रशांत डोंगरे यांचे विरुद्ध पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता खाजगी इसम पवार यांनी मागीतलेली 30000 रुपये लाच लोकसेवक डोंगरे यांचेकरीता डोंगरे यांचे सांगण्यावरूनच निलेश पवार यांनी मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच लोकसेवक डोंगरे यांनी तक्रारदार यांना तडजोड अंती 15000 रुपयाची मागणी करुण सदर लाच रक्कम खाजगी इसम शेख नेहाल यांचेकडे देण्यास सांगितली . खाजगी इसम नेहाल याने लाच रक्कम 15000 स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले . निलेश पवार व नेहाल शेख यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे .
हि कारवाई पोलीस अधिक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधिक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक शंकर शिंदे यांच्या टिममधील हनुमान गोरे , संतोष राठोड , स्नेहल कुमार कोरडे , गणेश मेहेत्रे यांनी केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!