बीड

बीड जिल्ह्यात शरद पवारांच्या तीन सभा होणार, 25 एप्रिलला माजलगाव, 9 मे बीड आणि 11 मे ला अंबाजोगाईमध्ये सभेचे नियोजन आखले

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढील काळात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 50 सभा होणार आहेत.बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी माजलगाव, बीड आणि अंबाजोगाई या ठिकाणी सभा होणार आहेत.पवारांनी बारामती नंतर अहिल्यानगर (अहमदनगर)आणि बीडवर लक्ष केंद्रित केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे सर्वेसर्वा शरद पवार महाराष्ट्रभर मॅरेथॉन दौरा करणार असून २२ दिवसांमध्ये तब्बल ५० सभा ते घेणार आहेत.

मागील विधानसभेला शरद पवार यांच्या सभेतील ताकद व युवा वर्गाशी झालेली अटॅचमेंट सर्वांनी पाहिली आहे. त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकांआधी ते ज्या सभा घेतील याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. १८ एप्रिलपासून बारामतीतून शरद पवारांच्या सभेला सुरुवात होईल तर जवळपास ११ मे पर्यंत हा सभांचा धडाका सुरु राहील.
२५ एप्रिलला अहमदनगरसाठी शेवगाव येथे सभेचे आयोजन तर बीडसाठी माजलगाव येथे नियोजन करण्यात आले आहे, तर ९ मे रोजी अहमदनगरसाठी पारनेर येथे आणि त्याच दिवशी बीडसाठी बीड येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच

११ मे रोजी बीडसाठी अंबेजोगाई येथे सभा होणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!