बीड

अखेर आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

   बीड दि.16 (प्रतिनिधी)बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार वंचित, दुर्बल, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या पालकांना दिनांक 16 एप्रिल 2024 पासून ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता प्रक्रिया सुरू झाली आहे.

प्रति वर्षाप्रमाणे याही वर्ष दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सन 2024-25 साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. येत्या शैक्षणीक वर्षात 25 टक्के राखीव जागांवरील आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया दि.16 एप्रिल ते 30 एप्रिल 2024 दरम्यान पालकांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मराठी अंतर्गत प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा असे आवाहन शरद गोसावी, शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांनी यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!