बीड

ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर सायबरमुळे मिळाले पैसे परत

.

सायबर पोलीस ठाणे, बीड येथे तक्रार क्रमांक 311/2023 मध्ये तक्रारदार नामे फारुख नजीर शेख रा. सिरसाळा ता. परळी (वै) जि. बीड यांना दिनांक 10/08/2023 रोजी एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरुन कॉला आला सदर व्यक्ती मोबी क्वीक कंपनीमधुन बोलत आहे असे सांगुन त्यांच्याकडुन ओटीपी व इतर माहीती विचारुन घेतली व काही वेळात तक्रारदार यांच्या बँक खात्यामधुन पैसे बजा झालेबाबत त्यांना मेसेज प्राप्त झाला.

सदर बाबत तक्रारदार फारुख नजीर शेख यांनी सायबर पोलीस ठाणे, बीड येथे तक्रार दिली सदर तक्रार वर तंत्रिक कार्यवाही करुन सदर तक्रारदार यांचे ऑनलाईन गेलेले पैसे दिनांक 06/03/2024 रोजी तक्रारदार यांच्या बँक खात्यावर जमा झाले.

सदर कामगीरी मा. पोलीस अधीक्षक बीड श्री नंदकुमार सो, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री सो, बीड यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. डी. बी. गात, पोना श्रीकांत बारगजे सायबर पोलीस स्टेशन बीड यांनी केली आहे.

सर्व नागरीकांनी ऑनलाईन पध्दतीने आर्थिक व्यवहार करताना, आलेले फोन, SMS, ची खात्री करुनच व्यवहार करावा असे सायबर पोलीस स्टेशन, बीड तर्फे आवाहान करण्यात येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!