बीड

बीडमध्ये भुकंप नव्हे, भुगर्भातील आवाज;घाबरू नका, जिल्हा प्रशासनाचे आवाहन


बीड, दि.6 (लोकाशा न्युज) ः- बीड जिल्ह्यातील बीड, गढी, गेवराई भागात मंगळवारी रात्री झालेल्या गुढ आवाजाने खळबळ माजली आहे. अशातच सदरच्या आवाजाचा भूकंपाशी संबंध नसून पाणी पातळी खालावल्यामुळे कधी कधी भूगर्भातून असे आवाज येतात, सदरील भुकंप नसून भुगर्भातील आवाज आहे, नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.बीड शहरात मंगळवारी रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी मोठा आवाज झाला. त्यामुळे खिडक्या, घराचे दरवाजे हादरली व भांडी पडली.अनेकांना भूकंप असल्याचे जाणवले.य ा घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, सदरचा प्रकार भूकंप नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लातूरच्या भूकंप निरीक्षण केंद्रात कोणत्याही भूकंपाची नोंद झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पाणी पातळी खालावल्याने जमिनीत निर्वात पोकळी निर्माण होते आणि त्यामुळे असे काही आवाज येऊ शकतात. तरी जनतेने घाबरुन जाऊ नये असे आवाहन बीड जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!