बीड

वडवणीत कापसाच्या व्यापार्‍याला लुटले, 50 ते 55 लाखांची कॅश पळविली, घटनास्थळी एलसीबीची टिम तात्काळ दाखल


बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : वडवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कापसाच्या एका व्यापार्‍याला लुटले असल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा ते साडे सहाच्या सुमारास घडली. या घटनेत तब्बल 50 ते 55 लाखांची कॅश पळविल्याची माहिती आहे, या घटनेची माहिती मिळताच बीड स्थानिक गुन्हे शाखेची टिम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. याप्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.
घाटसावळी येथील लांडे नामक व्यक्ती कापसाचा व्यवसाय करतात, घाटसावळी परिसरातील शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करून ते केज येथील एका जिनींगमध्ये विक्री करतात, त्यानुसार विक्री केलेल्या या कापसाचे पैसे ते बुधवारी केजवरून घेवून वडवणी मार्गे एका दुचाकीवर घाटसावळीकडे येत होते, सायंकाळी सहा ते साडे सहाच्या दरम्यान वडवणी हद्दीत त्यांच्या दुचाकीला अडवी गाडी लावून तीन ते चार जणांनी लांडे यांच्याकडील कापसाची 50 ते 55 लाख रूपयांची कॅश त्या चोरट्यांनी पळविली. या घटनेची माहिती मिळताच बीड स्थानिक गुन्हे शाखेची टिम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यानुसार सदर घटना कशी घडली याचा तपास करत एलीसीबीच्या टिमने चोरट्यांचा शोध घेण्यास सुरवात केली तर याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!