बीड

गूढ आवाजाने बीड हादरले

बीड- शहरातील अनेक भागात मंगळवारी (दि.६) रात्री ८ वाजून २० मिनिटांनी गूढ आवाज झाला. अचानक आलेल्या आवाजामुळे नागरिक व लहान बालके भयभीत झाली. हा आवाज कशाचा होता, हे समजू शकले नाही.
जिल्ह्यात यापूर्वी अनेकवेळा गूढ आवाज झाले आहेत.  दरम्यान, बीड शहरात मंगळवारी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी मोठा आवाज झाला. त्यामुळे खिडक्या, घराचे दरवाजे हादरली व भांडी पडली.अनेकांना भूकंप असल्याचे जाणवले. मात्र हा गूढ आवाज असल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!