बीड

मोठा दिलासा ! आज 74 जण होणार कोरोनामुक्त

कोरोनामुक्तमध्ये या भागातील रूग्णांचा समावेश



बीड, दि. 13 : बीड जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढली असली तरी कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्याही मोठी आहे. त्यानुसार आज बीड जिल्ह्यातील तब्बल 74 जण कोरोनामुक्त होणार आहेत. एकेकाळी शुन्य असलेल्या बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 2252 पर्यंत जावून पोहचली आहे. यामध्ये 917 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. सध्या 1276 रूग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे आज दि. 13 ऑगस्ट रोजी 74 जण रूग्ण कोरोनामुक्त होणार आहेत. यामध्ये बीडमधील 27, परळी 14, केज 17, गेवराई सात, आष्टी 2, पाटोदा एक, माजलगाव एक , धारूर दोन, अंबाजोगाई तीन या रूग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधितांना वेळेवर उपचार मिळाल्याने ते बरे होण्याची संख्याही वाढली आहे. ही जिल्ह्यासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!