केज दि.१७ – अभ्यास करूनही नीट परीक्षेत यश न आल्याच्या नैराश्यातुन तालुक्यातील साबला येथील रहिवाशी दिपाली विश्वनाथ नाईकनवरे (१८ ) या मुलीने शनिव दुपारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
दिपाली ही एमबीबीएस साठी मागील दोन वर्षा पासुन नीट परिक्षेसाठी तयारी करत होती. तीने भरपुर परिश्रम घेऊन देखील तिला नीट परिक्षेत अपयश आले. नुकताच दि. १३ जुन रोजी नीट परिक्षेचा निकाल लागला त्यात तिला कमी मार्क आले म्हणून तिने जीवन संपविले.साबला गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.