Uncategorized

धक्कादायक! बीडमध्ये बँकेवर दरोडा, लाखो रुपयांवर चोरट्यांचा डल्ला





बीड, 11 जून: बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील लिंबागणेश गावात महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर धाडशी दरोडा पडला आहे. बँकेचे लॉकर तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या दरोड्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

घटनेनं खळबळ

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील लिंबागणेश गावात धाडशी दरोडा पडला आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेवर चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे बँकेचे लॉकर फोडून चोरट्यांनी बँकेतील रक्कम आणि दागिन्यांवर डल्ला मारला आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


|

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!