Uncategorized

मिरचीच्या शेतात गांजाची लागवड, पंकज कुमावतांच्या पथकाने मारला छापा, सव्वा लाखाचा गांजा पकडला

काल दिनांक 07/06/2023 रोजी मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की मौजे चिंचपूर येथील इसम नामे सतपाल ग्यानबा घुगे हा आपले स्वतःचे फायदा करिता विनापरवाना बेकायदेशीर रित्या मिरचीच्या फडात गांजाच्या झाडाची लागवड करून त्याची चोटी विक्री करण्यासाठी त्याची जोपासना करीत आहे अशी माहिती मिळाल्यावर सदरची माहिती मा. पोलिस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब बीड यांना कळून त्यांचे मार्गदर्शनाखाली स्वतः मा.पंकज कुमावत साहेब व पोलीस ठाणे यु वडगाव येथील सपोनी योगेश उबाळे व पोलीस अधिकारी व अमलदार सह सदर ठिकाणी जाऊन दिनांक 07/06/ 2023 रोजी 16.15 छापा टाकून सदर ठिकाणी इसम नामे सतपाल ग्यानबा घुगे याच ताब्यात घेऊन मिरचीच्या फडाची तपासून पाहणी केली असता मिरचीच्या फडामधे एकूण गांजा एकूण गांजाची हिरवीगार अंदाजे साडेपाच ते सहा फूट उंचीचे डेरेदार नऊ झाडे मिळून आल्याने पंचनाम्यातील पंचायत समक्ष सदरची झाडे उपटून त्याचे वजन केले असता एकूण 24 किलो 830 ग्रॅम किमती अंदाजेचा 124000 रु माल मिळून आल्याने ताब्यात घेऊन आरोपी सतपाल ग्यानबा घुगे याचे विरुद्ध पोलीस ठाणे वडगाव येथे सपोनी योगेश उबाळे साहेब यांचे फिर्याद वरून कलम 20 NDPS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब बीड,अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब पोलीस ठाणे युसुफ वडगाव येथिल सपोनी योगेश उबाळे पोउपनी काळे सहाय्यक फौजदार राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल खेडकर डोंगरे मुंडे म्हेत्रे व उपविभागी पोलीस अधिकारी कार्यालयय केज येथील सहाय्यक फौजदार शेषराव यादव मुकुंद ढाकणे बालाजी दराडे आणि राजू वंजारे यांनी केली आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!