Uncategorized

डीसीसीत ट्रॅप, 20 हजाराची लाच घेताना एकाला पकडले


बीड दि.7 : माजलगाव तालुक्यातील खेर्डा सेवा सहकारी सोसायटीचे 1 एप्रिल 2004 ते 31 मार्च 2020 या कालावधीत केलेल्या लेखा परिक्षणाच्या फिसपोटी देय असलेली 50 हजार रुपयांच्या रकमेचा धनादेश मंजूर करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच स्विकारताना एकास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई बीड जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत (beed dcc bank) बुधवारी (7) दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आली.

लेखा परिक्षणाच्या चेकची मंजूरी घेण्यासाठी तालखेड शाखेचे बाबासाहेब कांडेकर यांनी हा चेक जिल्हा बँकेच्या मुख्य ऑफिसला पाठविला. त्या चेकची मंजुरी जिल्हा बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्री. ठोंबरे यांच्याकडून घेण्यासाठी ठोंबरे यांचा नातलग प्रथीमेश उर्फ बाळू ठोंबरे याने तक्रारदाराकडे 20 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ही रक्कम 20 हजार रुपये ठरविण्यात आली. ठरल्याप्रमाणे आज दुपारी लाचेची रक्कम स्विकारताना बाळू ठोंबरे यांस बीड येथील एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी केली. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!