Uncategorized

बीडमध्ये सराफा व्यापार्‍याला 34 लाखाला फसविले, शहर ठाण्यात नौकरावर गुन्हा दाखल


बीड (प्रतिनिधी) – सराफा व्यापार्‍याच्या दुकानातील नौकराने संगणकाचा पासवर्ड चोरून त्याआधारे संगणकातील ग्राहकांच्या सोने-खरेदी विक्रीच्या नोंदीमध्ये आणि स्टॉक विवरणात फेरबदल करून तब्बल 34 लाख 3 हजार 800 रूपयांची अफरातफर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सराफा व्यापार्‍याच्या तक्रारीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड शहरातील सराफा व्यापारी वैभव माणिकराव शहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या दुकानातील नौकराने दि.10 मार्च 2023 ते दि.14 मे 2023 या कालावधीत दुकानातील संगणकाचा पासवर्ड चोरून त्याआधारे सॉफ्टवेअर ओपन केले आणि ग्राहकांच्या सोन-खरेदी विक्रीच्या नोंदीसह स्टॉक विवरणात फेरबदल करत 34 लाख 3 हजार 800 रूपयांचे 549 ग्रॅम सोने नेले. या प्रकरणात अक्षय शशिकांत शहाणे याच्याविरूध्द कलम 408, 381 भांदवीसह कलम 66, 66(सी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम प्रमाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पो.नि.रवि सानप करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!