बीड ।दिनांक २९।
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे उद्या (ता. ३१) नवी दिल्लीत राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त होत असलेल्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर येत आहेत. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी हया कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.
पुण्यश्लोक महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती ३१ मे रोजी देशभर साजरी होत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी जयंतीनिमित्त ३१ तारखेला सायंकाळी ४ वा. नवी दिल्लीत लोधी मार्गावरील सत्यसाई ऑडिटोरियम येथे एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. कार्यक्रमाचं उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खा. पी. विल्सन, कर्नाटकचे आमदार एच विश्वनाथ, तेलंगणाचे आ. येगे मल्लेशाम, गुजरातचे खा. सागर राईका आदी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे यावेळी प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. कार्यक्रमास बहुसंख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन रासपच्या वतीनं करण्यात आलं आहे.
••••