Uncategorized

ना हरकत देण्यास शेतकऱ्यास लाच मागितली, महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह दोघांवर गुन्हा दाखल‌ ;लाप्रविचे पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी आणि टिमची कारवाई


परळी वैजनाथ दि २६ (लोकाशा न्युज) :- शेतकरी सिंचन विहीर फाईल मधील ना हरकत वर सही करण्यासाठी शेतकऱ्यास तीन हजाराची लास मागितली व ती स्वीकारण्याची कबूल केल्याबद्दल महावितरण उपविभाग परळी येथील कनिष्ठ अभियंता किरण निंबाळकर यांच्यासह एक खाजगी व्यक्ती अशा दोघाविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडाकेबाज कारवाई लाप्रवीचे पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी आणि टीम बीड यांनी आज दुपारी केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांचे वडिलांचे व साक्षीदारांचे भाऊ यांचे नावे असलेल्या शेतामध्ये महात्मा गांधी रा्ष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत अल्प भुधारक शेतकरी सिंचन विहीरीचे फाईल मधील ना हरकत प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी आरोपी किरण जयवंत निंबाळकर कनिष्ठ अभियंता महावितरण उपविभाग परळी, राहणार बँक कॉलनी परळी व शहाणीक दत्तात्रय अनुसे राहणार रेवली तालुका परळी लोकसेवक यांनी पंचासमक्ष खाजगी इसमाचे मार्फतीने लाचेची मागणी करून लाच रक्कम खाजगी इसम याचे मार्फतीने स्वीकारण्याचे मान्य केले व खाजगी इसम यांनी ३००० रू ची मागणी करून तडजोडी अंती फाईलवर सही घेऊन देण्यासाठी स्वतःसाठी २०० रु व लोकसेवकासाठी ५०० रू असे तीन फाईलचे प्रत्येकी ७०० रू प्रमाणे २१०० रू स्विकारण्याचे मान्य केले व ते सिध्द झाले म्हणुन परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडाकेबाज कारवाई संदिप आटोळे पोलीस अधीक्षक,
ला.प्र.वि. औरंगाबाद व
विशाल खांबे, अप्पर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि औरंगाबाद
शंकर शिंदे, पोलिस उपअधिक्षक, ला.प्र.वि बीड
यांच्या मार्गदर्शनाखाली रविंद्र परदेशी, पोलिस निरीक्षक ला.प्र.वि. बीड यांनी पथक अमलदार श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, गणेश म्हेत्रे ला.प्र.वि. बीड यांनी केली.
(चौकट)
“पीआय रविंद्र परदेशी यांचे आवाहन”
बीड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा अँन्टी करप्शन ब्युरो बीड चे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे व पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!