Uncategorized

सीईओंचा दणका, जलजीवनचे काम अडविणार्‍या कानडी माळीच्या सरपंचासह सदस्यावर गुन्हा दाखल


बीड, दि. 20 (लोकाशा न्यूज) : कानडी माळी (ता.केज) च्या सरपंचासह सदस्याला सीईओ अजित पवारांनी मोठा दणका दिला आहे. जलजीवन मिशनचे काम अडविल्याप्रकरणी त्या दोघांवर शाखा अभियंत्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केज ठाण्यात कलम 186, 34 भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत कानडी माळी येथे नळ पाणी पुरवठ्याचे काम मंजूर झालेले आहे. मात्र 12 मे 2023 रोजी या गावचे सरपंच अशोक राऊत, ग्राम पंचायत सदस्य गणेश राऊत यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी सदर कामाच्या ठिकाणी जावून सुरू असलेले हे काम बंद केलेले आहे. कार्यारंभ आदेशातील अटी व शर्ती मधील नियम क्र. 21 नमुद केल्याप्रमाणे शासकिय काम करताना आडथळा निर्माण केल्यास तेथे पोलिस संरक्षण देण्यात यावे, असा नियम आहे. त्याअनुषंगाने कानडीमाळी हे काम शासन नियमाप्रमाणे 2024 पर्यंत पुर्ण करणे हे ठेकेदाराला बंधनकारक आहे. तरी आपण सरपंच अशोक राऊत व ग्राम पंचायत सदस्य गणेश राऊत व त्यांच्या सहकार्‍यांवर शासकिय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून सदरचे काम पुन्हा सुरू करावे,असे लेखी पत्र सीईओ अजित पवार यांनी केज पोलिसांना दिले होते, या पत्रानंतर शनिवारी केज ग्रामीण पाणी पुरवठ्याचे शाखा अभियंता अनिल तांदळे यांनी केज ठाण्यात स्वत: जावून आपली फिर्याद दाखल केली आहे. कानडी माळी येथील पाईप लाईनच्या कामाला मंजूरी मिळाल्याने आम्ही व एल.डी. हुले प्रकल्प अभियंता वापकोस प्रा.लिमिटेड शाखा बीड मार्फत ठेकेदारांचे प्रतिनिधी सुजित शामसुंदर पडुळे यांना नळ पाणी पुरवठा पाईप लाईनचे काम करण्यासाठी सांगितलेले आहे. त्यानुसार त्यांनी कानडी माळी गावात रोडच्या कडेने अंदाज 10 किलो मिटर पाईप लाईनचे काम केलेले आहे. 12 मे 2023 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कानडीमाळी येथे सुजित शामसुंदर पडूळे यांनी पाईप लाईनचे काम सुरू केले असता गावातील सरपंच अशोक राऊत, सदस्य गणेश राऊत हे आले व म्हणाले की, आमच्या गावची योजना आहे ती करायची की नाही ते आम्ही ठरवणार असे म्हणाल्याने सुजित शामसुंदर पडूळे यांनी आम्हाला फोन करून त्याची माहिती दिली, त्यानंतर आम्ही कानडी माळी येथे गेलो असता ही आमच्या गावची योजना आहे ती करायची की नाही ते आम्ही ठरवणार असे म्हणून त्या दोघांनी शासकिय कामात अडथळा आणला, त्यामुळे त्यांच्या विरोधात माझी तक्रार असल्याचे तांदळे यांनी या फिर्यादीत म्हटले, त्यानुसार सरपंच अशोक राऊत आणि गणेश राऊत या दोघांवर केज पोलिसांनी कलम 186, 34 भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!