माजलगाव : लोकाशा न्युज
शहरातील शहरातील पाच सराफा व्यापाऱ्यांनी दागिन्यांची डिझाईन बनवायला दिलेले सोने बंगाली कारागीराने परत न करता फरार झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. याबाबत सराफ व्यापाऱ्यांनीच सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याने एकच खळबळ माजली आहे. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आलेली नाही.
माजलगाव शहरात जवळपास दीडशे सराफा व्यापारी दुकान आहेत. यातील बहुतांश व्यापारी हे ग्राहकांनी दिलेली डिझाईन बनवण्यासाठी या ठिकाणी डिझाईन बनवण्याचे दुकान टाकून या ठिकाणी सर्व व्यापारी सोने देऊन त्याच्याकडून विविध डिझाईन मध्ये दागिने तयार केले जातात. अशाच प्रकारे शहरातील पाच व्यापाऱ्यांनी डिझाईन बनवण्यासाठी दिलेले सोने घेऊन हा बंगाली शनिवारी रात्री शहरातून फरार झाले असल्याचे सोशल मीडियावर आलेल्या पोस्टमुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
या बंगालीने या पाच व्यापाऱ्यांचे जवळपास अर्धा किलो सोने घेऊन फरार झाली असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर एक मोटार सायकल ( एम.एच.२० इ एक्स ३१३४) नेल्याचे देखील या सराफा व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या सोन्याची किंमत जवळपास ३० लाख रुपये व मोटरसायकलची किंमत ९० हजार रुपये असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
याबाबत हे व्यापारी रविवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी या सोन्याच्या पावत्या मागितल्याने हे सराफ व्यापारी परत पोलीस ठाण्याकडे फिरकलेच नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.