Uncategorized

कर्नाटकात काँग्रेसची एक हाती सत्ता, 131 जागांवर आघाडी घेतली, भाजप 66, जेडीएस 21

बीड, संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 मतदारसंघांसाठी 10 मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतदान पूर्ण झालं. या वेळी राज्यात विक्रमी 73.19 टक्के मतदान झालं.224 जागांसाठी निकाल हा आज जाहीर होणार आहे. त्यानुसार याठिकाणी भाजप कोमात तर काँग्रेस जोमात असल्याचे पाहायला मिळत आहे, 131 जागांवर काँगेस आघाडीवर आहे तर भाजप 66,जेडीएस 21 तर इतर सहा जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस ने एक हाती सत्ता जवळपास मिळविली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!