Uncategorized

शिविगाळ केल्याच्या रागातून अज्ञात व्यक्तीचा खून, आरोपीची पोलीस स्टेशन मध्ये येऊन कबुली, तीन-चार महिण्या पूर्वीची सिरसाळ्यातील घटना

     सिरसाळा  : दारुच्या नशेत शिविगाळ केल्याच्या रागातून एकाने एका अज्ञात व्यक्तीचा खून केल्याची घटना सिरसाळ्यात उघड झाली आहे. 
  या विषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सविस्तर वृत्त असे कि, भूजंग वाघमारे रा परळी वैजनाथ वय ३५ हा तीन-चार महिण्यापुर्वी सिरसाळ्यात काही कामानिमित्त आला होता.विहार परिसरातील तेलगाव रोडलगत यातील अज्ञात मयत युवक दारुच्या नशेत तूर्र होता. ह्या अज्ञात मयत युवकाची व आरोपी भुजंग वाघमारे याची समोरा समोर धडक झाली. नशेत असाणारा तो अज्ञात मयत युवकाने भुजंग वाघमारे यास शिविगाळ केली. याचा राग आल्याने भुजंग ने त्याच्या डोक्यात लाकडाने मारहाण केली. जखमी/मयत त्या युवकास उचलून महावितरणाच्या जुण्या पडक्या निवासी ईमारतीत दुस-या मजल्यावर नेऊन टाकले. 

तो मेला होता का ? का जिवंत होता ? निघून गेला ? हे पाहण्यासाठी काल दिनांक १२ रोजी सायंकाळी भुजंग वाघमारे त्या ठिकाणी पाहण्यास गेला . मारहाणीतील त्या युवकाची बाॅडी त्याला सडलेल्या अवस्थेत दिसली. स्वता मारहाण करणारा भूजंग वाघमारे सिरसाळा पोलीस स्टेशन मध्ये गेला व घडला प्रकार सांगितली आहे. सिरसाळा पोलीसांनी भूजंग वाघमारे यास ताब्यात घेतले आहे. माहिती कळताच सह पोलीस निरीक्षक संदिप दहिफळे व त्यांची टिम घटनास्थळी धावली, पाहणी केली. मयताचे प्रेत खुपच सडले असल्याने शवविच्छेदन घटनास्थळीच करणार असल्याची माहिती समजते आहे. पोलिस प्रशासन या प्रकरणी अधिक तपास करत आहे .

न पटणारी कबूली

  • यातील आरोपी भुजंग वाघमारे म्हणतो कि, सिरसाळ्यातील तेलगाव रोड लगत विहार समोर त्या युवकास मारहाण केली. त्याला दुचाकी वर उचलून सदर इमारती च्या ठिकाणी नेले आणि टाकले तीन-चार महिण्याने पुन्हा त्या ठिकाणी तो पहायला येतो कि तो युवक जिवंत आहे का ? मेला ? गेला ? आणि पोलीस स्टेशन ला येऊन कबूली देतो. त्याला सदर ईमारत पडक आहे हे कसे माहित ? तो जागीच मेला नव्हता तर तेवढ्या अडचणीत नेऊन टाकला कसा ? आणि का ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.तपासात हे प्रकरणाचा उलगडा होईलच.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!