बीड/प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला राजीव गांधी चौक ते करपरा नदीपर्यंतचा रस्ता त्वरित करण्यात यावा व सदरील कामात येणारे अडथळे दूर व्हावे त्यासाठी दोन दिवसांपूर्वी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांची भेट घेतली होती व त्यांना सदरील कामाची माहिती दिली होती. यानंतर जिल्हाधिकारी यांनी सदर रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याचे निर्देश नगरपालिकेला दिले आज दोन दिवसानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार काल सदरील रस्त्याचे काम चालू झाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा रस्ता डॉ. योगेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अवघ्या काही दिवसात सोडवला आणि भैय्यांच्या मागणीला यश आले. राजीव गांधी चौक ते करपरा नदीपर्यंतचे काम चालू झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सदरील रस्ता गुणवत्तापूर्वकच केला जाईल व येत्या काही दिवसात हा रस्ता नागरिकांना रहदारीसाठी खुला असे आश्वासन डॉ. योगेश क्षीरसागर यांनी दिले आहे.
राजीव गांधी चौक ते करपरा नदी पर्यंतच्या रस्त्याचे काम मंजूर झालेले असून ते काम सुरू करण्यात आले होते. मात्र स्थानिक काही लोकांनी काम अडविल्याने मागील काही महिन्यांपासून बंद पडलेले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून ये जा करताना वाहन धारकांना देखील त्रास होत असून अनेक अपघात देखील या रस्त्यावर घडले होते. या रस्त्यावर नाली नसल्यामुळे घान पाणी रस्त्यावर साचत असल्याने यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी ठिय्या आंदोलन देखील केले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना डॉ.योगेश क्षीरसागर यांनी रस्त्याच्या कामासंदर्भात माहिती दिली व स्थानिक नागरिकांना होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विनंती केली. डॉ योगेश क्षीरसागर यांच्या या मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ योग्य ती कारवाई करण्याचे आदेश नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना दिले होते या संपूर्ण प्रक्रियेनंतर काल दि 10 रोजी या भागातील नालीच्या कामास सुरुवात झालेली आहे तसेच येत्या काही दिवसात संपूर्ण रोडच दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात येणार असून नागरिकांसाठी देखील हा रोड लवकरच खुला करण्यात येणार असल्याचे आश्वासन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिले आहे.