Uncategorized

ईद-ए-मिलाप च्या माध्यमातून माणुसकीचे दर्शन- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, हजारो हिंदू मुस्लिम बांधवांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा

बीड/प्रतिनिधी
तीस दिवस उपवास करून स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून ईद-विलाद च्या माध्यमातून माणुसकीचे दर्शन घडवणारा हा सण असून या सणानिमित्त हजारो हिंदू मुस्लिम बांधवांनी आज एकमेकांना शुभेच्छा दिल्या हीच तर खरी माणुसकी असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे

आज के एस के महाविद्यालयाच्या परिसरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर माजी नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर डॉ योगेश क्षीरसागर आणि डॉक्टर विठ्ठल क्षीरसागर यांच्या वतीने ईद मिलाफ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी सहा वाजल्यापासून या ठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहू लागले यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी येणाऱ्या प्रत्येक मुस्लिम बांधवांचे स्वागत करून आदरातिथ्य केले

यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की आज हजारो हिंदू मुस्लिम बांधव एकत्र आल्याचे चित्र दिसू लागले आहे आज आपण सर्वजण उपस्थित राहिलात याचे खूप समाधान वाटते शांती अमन आणि तनमन प्रफुल्लित करण्यासाठी आपण समाजाचे काही देणे लागतो ही उदात्त भावना ठेवून ईदनंतर आपण दानधर्म देखील करतो 30 दिवस उपवास करून स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक समाधान मिळवले जाते संपूर्ण देशभरात ईद नंतर ईद मिलाफ आयोजित केला जातो याद्वारे फक्त एकमेकांच्या सहवासातून माणुसकीचे दर्शन घडवले जाते आपले सर्वांचे कर्तव्य आहे की माणुसकी ठेवून सर्वांनी आपण आपल्या सुखदुःखात सहभागी होऊन एकमेकांना मदत करायला हवी, रमजान म्हणजे बरकती आणि ईद म्हणजे आनंद हा परस्परांमध्ये स्नेहभाव वाढवणारा महिना असल्यामुळे रमजान ईद मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र आणि मंगलमय असा हा सण मानला जातो मुस्लिम बांधव महिन्याभराचे उपवास करण्याची ताकद दिल्याबद्दल अल्लाहचे आभार मानतात रमजान मध्ये जकात म्हणून गरिबांना मदत केली जाते दानधर्म केला जातो पुण्य कमवा आणि पापाला जाळा हाच रमजानचा मुख्य संदेश असून अल्लाह च्या आज्ञेचे पालन करणारा आणि शांततेचे रक्षण करणारा असा हा समाज आहे आज आमच्या परिवाराच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना मी मनापासून धन्यवाद देतो असे सांगून त्यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या
यावेळी सर्व माजी नगरसेवक, डॉक्टर, वकील,पत्रकार,मुस्लिम समाजातील मान्यवर,तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत होते

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!