Uncategorized

पंकजाताई मुंडे यांनी घेतल्या ‘जवाहर’ च्या मतदारांशी गाठीभेटी ; बैठकांमधून साधला संवाद, प्रभू वैद्यनाथाचेही घेतले दर्शन ; लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांची उपस्थिती

परळी वैजनाथ ।दिनांक ०१।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज सकाळी जवाहर शिक्षण संस्था निवडणूकीच्या अनुषंगाने मतदारांच्या गाठीभेट घेत मतदारांशी संवाद साधला. सकाळी लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांसह त्यांनी प्रभू वैद्यनाथाचेही दर्शन घेतले.

जवाहर शिक्षण संस्थेच्या ३२ जागांसाठी येत्या ६ मे रोजी मतदान होत आहे, त्या अनुषंगाने पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलने प्रचारात आघाडी घेतली आहे. आज  सकाळी सोमवार निमित्त पॅनलच्या सर्व उमेदवारांसह पंकजाताई मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथ मंदिरात जाऊन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले व त्यानंतर  शहरात विविध ठिकाणी जाऊन  संस्थेच्या  मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांच्याशी त्यांनी संवादही साधला. या भागातील मुला-मुलींना  दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतुने मुंडे साहेबांनी वैद्यनाथ काॅलेजमध्ये चांगले आणि पोषक शैक्षणिक वातावरण निर्माण केले ज्याचा चांगला परिणाम शैक्षणिक प्रगती होण्यावर झाला. अनेक विद्यार्थी मेडिकल, इंजिनिअरिंगला लागले. संस्था भरभराटीला आणली, हे सर्व   कायम टिकून ठेवायचे असेल तर पॅनलच्या उमेदवारांना सर्वाधिक मतांनी विजयी करा असं आवाहन पंकजाताईंनी यावेळी मतदारांना केलं.

याप्रसंगी वैद्यनाथ देवस्थानचे सचिव राजेश देशमुख, ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे, दत्ताप्पा इटके, जुगलकिशोर लोहिया, विकासराव डुबे, विनोद सामत, रमेश कराड, विजय वाकेकर, प्रा. शांती लाहोटी, एस. एल. देशमुख, जी एस सौंदळे, शांतीलाल जैन, गंगाधर शेळके, डाॅ वंगे, डाॅ. दे. घ. मुंडे, विलास मुंडे, अनिल तांदळे, पवन मुंडे, निळकंठ चाटे, श्रीराम मुंडे, रवि कांदे, प्रकाश जोशी, शशिकांत मुंडे, नितीन समशेट्टी आदींसह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!